img
img
Share On Facebook

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर करण जोहरवर घराणेशाही आणि गटबाजीला प्रोत्साहन दिल्याचा सतत आरोप होतोय. या आरोपांनंतर करणने सोशल मीडियापासून दूर राहणे पसंत केले. आता बातमी आहे की, करणने मामी म्हणजेच मुंबई अकॅडमी ऑफ द मुविंग इमेजला आपला राजीनामा दिला आहे. करण या फिल्म फेस्टिव्हलच्या बोर्डचा सदस्य होता.

दिग्दर्शिका स्मृती किरण यांना मेल केला राजीनामा करणने आरोपांमुळे नाराज होऊन या फिल्म फेस्टिव्हलच्या संचालिका स्मृती इराणी यांना आपला राजीनामा ई-मेलद्वारे पाठविल्याचं कळतंय. दरम्यान अशीही बातमी आहे की, मामी फिल्म फेस्टिव्हलची अध्यक्षा आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने करणला समजवण्याचा प्रयत्न केला, पण करणने तिचे म्हणणे ऐकले नाही आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मामीच्या बोर्डावर विक्रमादित्य मोटवाने, सिद्धार्थ रॉय कपूर, दीपिका पदुकोण, जोया अख्तर आणि कबीर खान यांचा समावेश आहे.

फिल्मनगरी
व्हिडीओ