img
img
Share On Facebook

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; प्रत्येक जिल्ह्यातील २ गावांची प्रारंभी केली निवड मुंबई : शेतकरी डोळे लावून बसलेल्या महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ सोमवार, २४ पासून मिळण्यास प्रारंभ होत आहे. पहिल्या टप्प्यात राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांची निवड केली असून सुमारे २० हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात उद्यापासून पैसे जमा होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केली. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत अाहे. महिलांवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात ५ मार्च रोजी महिलांच्या समस्यांवर चर्चा होईल. ६ मार्चला अर्थसंकल्प मांडला जाईल. पूर्वसंध्येला परंपरेप्रमाणे विरोधकांसाठी सायंकाळी सह्याद्री राज्य अतिथीगृहावर महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने चहापान आयोजित करण्यात आले होते. त्यावर विरोधकांनी बहिष्कार घातला. एल्गारबाबत स्पष्टीकरण एल्गारचा तपास एनआयएकडे दिल्याबद्दल शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याबद्दल प्रथमच मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, तपास एनआयएकडे राज्य सरकारने नव्हे, केंद्राने सोपवला. त्यावर नाराजी आहेच. केंद्राने पोलिस दलावर एक प्रकारे अविश्वास व्यक्त केला. फडणवीसांना टोला देवेंद्र फडणवीस यांनी ३४ हजार ५०० कोटींची सर्वात मोठ्या कर्जमाफीची घोषणा केली होती. प्रत्यक्षात ७ महिन्यांनी अंमलबजावणी सुरू झाली. ‘अचाट वाटावे म्हणून सुरू करायचे व पेलवत नाही म्हणून उताणे पडायचे असले धंदे आमचे सरकार करणार नाही,’ असे ते म्हणाले.

पैसा बोलता है
व्हिडीओ