img
img
Share On Facebook

मुंबई : चीनमधील करोना व्हायरस आता इतर आशियाई देशांमध्ये पसरू लागल्याने आशियातील अर्थव्यवस्थेसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. याचा जगभरातील गुंतवणूकदारांनी धसका घेतला असून मुंबई शेअर बाजारात पडसाद उमटले. आज बाजार उघडताच सेन्सेक्स ४८० अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १२७ अंकांची घसरण झाली. आज सकाळपासून गुंतवणूकदारांनी सर्वच क्षेत्रात विक्रीचा सपाटा लावला. या आठवड्याअखेर तिसऱ्या तिमाहीची जीडीपी आकडेवारी जाहीर होणार आहे. मंदीचा प्रभाव पाहता विकासदर आणखी घसरेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेअर बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले. चीन पाठोपाठ आता दक्षिण कोरियात करोना व्हायरसने ७ जणांचा बळी गेला आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. दरम्यान, आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या पहिल्या भारत दौऱ्यावर दाखल झालेत. सकाळी ११.४० च्या सुमारास डोनाल्ड ट्रम्प यांचं एअरफोर्स वन विमान अहमदाबाद विमानतळावर दाखल झालं. संध्याकाळी ते भारतीय उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये द्वीपक्षीय व्यापारी करारांबाबत अद्याप ठोस घोषणा करण्यात आलेली नाही.

सायन्स टेक
व्हिडीओ