img
img
Share On Facebook

बीजिंग: चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या करोनाने आतापर्यंत २७०० हून अधिकजणांचा बळी घेतला आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या नवीन रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याची काहीशी दिलासादायक माहिती समोर आली आहे. मात्र, मृतांचा आकडा सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. चीनमध्ये करोनाचा संसर्ग झालेले रुग्णांची संख्या ७८ हजार ६४ इतकी झाली आहे. मंगळवारी, करोनाचा संसर्ग झालेले ४३९ नवीन संशयित रुग्ण आढळले असल्याची माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य खात्याने दिली आहे. गंभीर प्रकृती असलेल्या प्रकरणांमध्ये ३७४ रुग्णांची घट झाली आहे. रुग्णालयातून २९ हजार ७४५ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. चीनमध्ये मृतांची संख्या २७१५ झाली असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले. मंगळवारपर्यंत हाँगकाँगमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून करोनाचे ८५ रुग्ण आढळले असल्याचे समोर आले आहे. मकाऊमध्ये १० आणि तैवानमध्ये ३१ जणांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तर, एकाचा बळी गेला आहे.

पैसा बोलता है
व्हिडीओ