img
img
Share On Facebook

अभिनेत्री यामी गौतमने चंदीगडमध्ये नवीन घर विकत घेतले आहे. मीडिया रिपोर्टनुसार यामीला आपल्या कुटुंबामुळे याच शहरात घर हवे होते. हिमाचल प्रदेशात जन्मलेली यामी चंदीगडमध्ये वाढली. गेल्या वर्षी ती सेंद्रिय शेती करण्यासाठी तिच्या फार्म हाऊसवर गेली होती. अहमदाबाद मिररच्या वृत्तानुसार, यामीच्या जवळच्या स्त्रोतांनी सांगितले की, तिने अलीकडेच चंदीगडमध्ये डुप्लेक्स विकत घेतले आहे. हे शहरातील तिचे पहिले घर आहे. आठवडाभरात यामी तिच्या कुटुंबासोबत नवीन घरी शिफ्ट होईल. या अभिनेत्रीने यापूर्वी 2016 मध्ये 25 एकरांवर बांधलेले 100 वर्षे जुने हेरिटेज होम खरेदी केले होते.

सायन्स टेक
व्हिडीओ