img
img
Share On Facebook

बंगळुरु : विधवा महिलेने एका स्वामीने २०१६ ते २०१९ दरम्यान आपल्याला तीन किलो सोनं व २७ कोटी रुपयांना फसवलं असा आरोप केला आहे. बंगळुरुच्या रामामुर्थीनगरमध्ये राहणाऱ्या या महिलेचे नाव गीता असून तिला तीन मुले आहेत. २००९ साली नवऱ्याचा मृत्यू झाल्यापासून ती कुटुंबाचा सांभाळ करत आहे. तावरेकेरे आणि शहराच्या अन्य भागांमध्ये या महिलेच्या मालकीची शेती आणि मोठया प्रमाणावर प्रॉपर्टी आहे. गीताचा तिच्या काही नातेवाईकांबरोबर संपत्तीवरुन वाद सुरु होता. त्यावेळी तिच्या शेतात काम करणाऱ्या एका मजुरीने बांगरपेठच्या सी. नागाराज बरोबर तिची भेट घडवून दिली. आपल्याकडे काळी जादू असून, समस्यांमधून मुक्ती मिळवून देण्याचे त्याने आश्वासन दिले होते. “नागाराज माझ्या घरी आला होता, तेव्हा त्याने देवाने मला पाठवले असून, तुम्हाला सर्व समस्यांमधून मुक्त करेन” असे सांगितले होते. नागाराजने सांगितल्यानुसार पूजेसाठी महिलेने त्याला तीन किलो सोने दिले. काही मालमत्तांमुळे अडचणी उदभवत असून, त्याच्या आदेशावरुन महिलेने त्या मालमत्ता विकून टाकल्या. संपत्ती विकल्यानंतर त्यातून मिळालेले २२ कोटी, त्याशिवाय आणखी पाच कोटी रुपये त्याने आपल्याकडून घेतले असा दावा महिलेने केला आहे. दुसऱ्या मालमत्ता विकत घेण्यासाठी म्हणून त्याने माझ्याकडून हे पैसे घेतले होते. पण, जेव्हा तो टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आले, तेव्हा मी पैसे परत मागितले. पण त्याने मला आणि माझ्या तिन्ही मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी नागाराज विरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

पैसा बोलता है
व्हिडीओ