img
img
Share On Facebook

परळी : परळीत संविधान संरक्षण समितीच्या वतीने मागील ३२ दिवसांपासून शहरातील नेहरू चौकात बेेमुदत धरणे आंदोलन सुरू असून २६ फेब्रुवारी रोजी येथील आंदोलनस्थळी रात्री सीएए,एनपीआर, एनआरसी कायद्यासह दिल्लीतील हिंसाचाराच्या निषेधार्थ २०३ तरुणांनी तोंडावर काळ्या फिती लावून सामूहिक मुंडण केले. येथील संविधान संरक्षण समितीच्या वतीने परळी शहरातील नेहरू चौक तळ येथे ३२ दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान दिल्ली येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ परळी येथील इम्रान खान, तहसीन नवाब, सय्यद अझहर, एजाज मौजान, शेख अजीम, सलीम राज, तखीं खान, मरसलीन खान, असलम राज, शेख अश्फाक, ए.पी.रज्जाक, फैसल कुरेशी, सय्यद समीर यांच्यासह जवळपास २०३ युवकांनी एकत्रित येत सामुदायिकरीत्या मुंडण केले. या वेळी परळी येथील संविधान संरक्षण समिती अध्यक्ष पी.एस.घाडगे, मुफ्ती अश्फाक, अनंत इंगळे, जी.एस. सौंदळे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सांस्कृतिक कार्यवाहक मनोहर जायभाय यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. या वेळी अंनिसचे बीड जिल्हाध्यक्ष प्रदीप चव्हाण, प्रा.विलास रोडे, शौकत पठाण, विकास वाघमारे तसेच राजा खान, हाजी बाबा, लाला खान, शेख शमू, नगरसेवक शेख शरीफ, उमर बागवान आदी सहभागी झाले होते.

देश-विदेश = राज्य
व्हिडीओ