img
img
Share On Facebook

. औसा : शासकीय सेवेत असलेल्या पतीच्या निधनानंतर शासनाकडून मिळणारी मदत घेण्यासाठी सहा महिन्याच्या बाळाला घेवून शासकिय कार्यालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या छकूबाईला अखेर औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने आर्थिक मदत मिळाली असून आता या महिलेला शासकीय सेवेत सामावून घेतले जाणार आहे. माळकोंडजी (ता.औसा) येथील छ्कूबाई महादेव कोळी हिचा विवाह सहा वर्षापूर्वी उजनी येथील तानाजी कोळी यांच्याशी झाला.दरम्यान यवतमाळ येथे जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य सेवक म्हणून कार्यरत असताना आजाराने त्यांचे निधन झाले.यावेळी छ्कूबाई या वृध्द सासू बरोबर राहत असत यामध्ये पतीच्या निधनानंतर अवघ्या दोन महिन्यांत सासुबाईचे निधन झाले.व विवाह अगोदरच छ्कूबाई च्या सासरे यांचे निधन झाल्याने छ्कूबाई आपल्या मुलासोबत माळकोंडजी येथील आपले वडील महादेव कोळी यांच्याकडे राहायला आली.शासकिय कार्यालयातून आर्थिक साहाय्य व्हावे यासाठी गेल्या सहा वर्षांपासून आपल्या बाळाला घेवून त्या यवतमाळ जिल्ह्य़ातील संबंधित अधिकारी यांच्याकडे भेटून आपली कैफियत मांडायच्या मात्र तुम्हाला शासकीय मदत मिळवून देवू म्हणून प्रत्येक वेळी आश्वासन मिळायचे.यामुळे जाणवत असलेली आर्थिक चणचण व शासकिय कार्यालयातून छकूबाईला कसलीही आर्थिक मदत मिळत नसल्याने मोलमजुरी करून छ्कूबाई आपला उदरनिर्वाह भागवत असे आशातच माळकोंडजी येथील माजी सरपंच संजय कुलकर्णी यांनी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांची भेट छ्कूबाई व त्यांचे वडील महादेव कोळी याच्याशी घातली यावेळी आमदारांसमोर छ्कूबाई कोळी यांनी आपली व्यथा मांडली या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून आमदार अभिमन्यू पवार यांनी तातडीने यवतमाळ येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला व याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे सांगितले व संबंधित महिला हि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपला उदरनिर्वाह चालवत असून त्यांना शासकीय सेवेत लवकर सामावून घ्यावे सांगितले. यानंतर लगेचच छ्कूबाई कोळी यांच्या खात्यावर एक लाख रुपये जमा झाले असून काही महिन्यांत आणखी तीन ते चार लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन यवतमाळ प्रशासनाकडून देण्यात आले आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या तत्परतेने गेल्या सहा वर्षांपासून प्रशासनाचे उंबरे झिजवणाऱ्या छकूबाईला आर्थिक मदत मिळाली.यामुळे नुकत्याच एका कार्यक्रमात छ्कूबाई कोळी त्यांचे वडील महादेव कोळी व छ्कूबाई च्या लहान मुलांनी आमदार अभिमन्यू पवार यांना मिठाई व पुष्पगुच्छ देवून त्यांचे आभार मानले.

सायन्स टेक
व्हिडीओ