img
img
Share On Facebook

भुवनेश्वर: सीएएवरून विरोधक लोकांमध्ये भ्रम पसरवत असून ते लोकांना भडकण्याचे काम ही करत आहे. इतकेच नाही, तर ते दंगलीही घडवून आणत आहे, असे थेट गंभीर आरोप शहा यांनी केले. ते भुवनेश्वर येथील एका सभेला संबोधित करत होते. काँग्रेस पक्षाचे ५५ वर्षांचे शासन आणि भारतीय जनता पक्षाचे ५ वर्षांचे शासन यांची तुलना करून पाहा असेही शहा म्हणाले. सीएएवरून कुणाला जर असे वाटत असेल, की हा नागरिकत्व घेणारा कायदा आहे, तर ते चूक असून हा कायदा नागरिकता घेणार नसून तो नागरिकता देणार आहे हे लोकांनी लक्षात घ्यावेस असे शहा म्हणाले. सीएएबाबत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करताना शहा पुढे म्हणाले की, 'शेजारी देशांमधील अल्पसख्याक समुदायाच्या लोकांचा तेथे शोषण होत असते, त्यांना त्रास दिला जातो. ते तेथून पळून येतात. मात्र भारतात त्यांना नागरिकत्व मिळत नाही. त्या देशांमध्ये अत्याचार झाल्याने स्वधर्म वाचावा म्हणून ते भारतात येतात. अशा लोकांना सीएएच्या माध्यमातून नागरिकता दिली गेली पाहिजे.' सीएएबाबत विरोधक संभ्रम निर्माण करतात असा थेट आरोप शहा यांनी केला. जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल या नेत्यांनी जे आश्वासन दिले होते तेच आश्वासन केंद्रातील मोदी सरकार पूर्ण करत असल्याचे ते म्हणाले. सीएएच्या कोणत्या कलमात नागरिकता घेण्याचे नमूद केले आहे ते विरोधकांनी दाखवून द्यावे, असे आवाहनही शहा यांनी विरोधकांना केले आहे.

सायन्स टेक
व्हिडीओ