img
img
Share On Facebook

वसई : मराठी नृत्य अभिनेत्री मेघा घाडगे यांच्या फेसबुक पोस्टवर अश्लील शब्दांत कमेंट केल्याची घटना रविवारी घडली. ही कमेंट करणाऱ्या व्यक्तीविरोधात मिरा रोडच्या नयानगर पोलिस ठाण्यात मेघा यांनी गुन्हा दाखल केला. मिरा रोड येथे राहणाऱ्या मराठी नृत्य अभिनेत्री मेघा घाडगे यांनी आपल्या फेसबुक पेजवर त्यांच्या नृत्याचा फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्या वाचत असतानाच सरूप पांडा नामक अनोळखी व्यक्तीने त्याच्यावर अश्लील शब्दांत शेरेबाजी केल्याचे त्यांना दिसून आले. याबाबत तक्रार करण्यासाठी नयानगर पोलिस ठाण्यात गेले असता पोलिसांनी याप्रकरणी सुरुवातीला तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप घाडगे यांनी केला. अखेर एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला फोन केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी त्यांची तक्रार दाखल करून घेतली. या प्रकारामुळे त्रास झाल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास बर्वे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

पैसा बोलता है
व्हिडीओ