img
img
Share On Facebook

मुंबई : मराठवाड्यातील काही भागात रात्री अवकाळी पाऊस झालाय. काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळं ज्वारी, हरभऱ्याच्या पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. काही भागात गारपीठही झाली आहे. त्यामुळं उघड्यावर असलेला कांदा भिजल्यानं शेतकऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. अचानक झालेल्या पावसाने डॉक्टरवाडी, जळगाव-बुद्रुक, पोखरीसह काही गावांमध्ये गारपीट आणि जोरदार पावसाने शेतातील उभे गहू, हरभऱ्याची पिकं आडवी पडली. उन्हाळी कांद्यालाही गारपीटीच्या तडाखा बसला आहे. दरम्यान पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची विनंती शेतकऱ्यांनी पालकमंत्री, आमदारांकडे केली आहे. पुणे शहरातही ढगाळ वातावरण झालं होतं. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. लातूरमध्ये काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून निटूर परिसरात पहाटे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. थोडा वेळ आलेल्या पावसाने वातावरणात गारवा वाढला आहे.मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात आज (1 मार्च) विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर व मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांच्या काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय विदर्भात तुरळक ठिकाणी आज गारपीट होईल, असा इशारा देण्यात आलाय.

पैसा बोलता है
व्हिडीओ