img
img
Share On Facebook

नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे. बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा 43 हजार 228 रुपयांवरून 44 हजार 383 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याच्या किंमतीमध्ये आज 1 हजार 155 रुपयांनी वाढ झाली. मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या भावात प्रति तोळा 6 रुपयांनी वाढ झाली होती. Cornovirus चा वाढता धोका पाहता देशांतर्गत बाजारात सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे आज शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यामुळे सुद्धा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती देण्यात आली आहे. सोन्याचे आजचे दर गगनाला भिडले आहेत. इतिहासातील सर्वात मोठा सोन्याचा दर आज नोंदवण्यात आला आहे. तर चांदीलाही झळाळी प्राप्त झाली आहे.बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा 1 हजार 155 रुपयांनी महागलं आहे. तर चांदीचे दर प्रति किलो 1 हजार 198 रुपयांनी वाढले आहेत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार अमेरिकेतील सेंट्रल बँकेचे व्याजदर घटले आहेत तर दुसरी कोरोनाचा धोका वाढला आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक करण्याला अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीनी एवढी उसळी घेतली आहे.

पैसा बोलता है
व्हिडीओ