img
img
Share On Facebook

गोंदिया : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याने आपल्या पाच वर्षीय मुलीसमोरच पत्नीची गळा दाबून हत्या केल्याने खळबळ उडालीय. गोंदिया शहरातील कुडवा इथली ही घटना आहे. गेल्या तीन दिवसात गोंदियात झालेली ही हत्येची ही दुसरी घटना आहे. सुमन मनोज सावनकर (28 )असे पीडीत महिलेचं नाव आहे. आरोपी मनोज झनकलाल सावनकर हा आपली पत्नी सुमन सावनकरच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यावरू वारंवार त्यांचं भांडणही होत होतं अशी माहिती शेजाऱ्यांनी दिलीय. शुल्लक कारणांवर मनोज हा सुमनला मारहाण करत होता. घटनेच्या दिवशीही त्यांचं भांडण झालं. तो सुमनला मारहाण करत होता. त्यावेळी त्यांची 5 वर्षांची मुलगी तिथेच होती. त्याने मारपीट करून सुमनचं डोकं भिंतीवर आपटले त्यानंतर गळा दाबून हत्या केला. ही घटना लपविण्यासाठी तो तिला स्वत: हॉस्पिटलमध्ये घेवून गेला. त्यावेळी डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केल्यानंतर आरोपी मनोजने सुमनला पुन्हा घरी आणून मृत अवस्थेत ठेवून घरून पसार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेवुन आरोपी पतीला अटक केली आहे. या हत्येमागे दुसरं काही कारण आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. सुमनच्या नातेवाईकांनी मनोज हा तिला कायम त्रास देत होता असा आरोप केलाय. त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणीही त्यांनी केलीय.

कानुन की बात
व्हिडीओ