img
img
Share On Facebook

कोल्हापूर : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात 2012 ते 14 या काळात विद्यार्थिनींकडून लैंगिक छळाच्या तक्रारी आल्या होत्या. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात होती. मात्र, या समितीने चौकशी अहवाल दडपल्याचा आरोप स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालिका डॉ. मेधा नानिवडेकर यांनी केला आहे. विद्यमान कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे हे या प्रकरणात लक्ष देत नसल्याने कुलपतींकडे याबाबत तक्रार करणार असल्याचेही डॉ.नानिवडेकर यांनी सांगितलं आहे. काय आहे प्रकरण? कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात 2012 ते 14 या काळात विद्यार्थिनींकडून लैंगिक छळाच्या तक्रारी आल्या होत्या. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने एक समिती नेमण्यात होती. समितीने प्रकरणाची चौकशीही केली. मात्र, जून 2016 पासून हा चौकशी अहवाल दडपून ठेवला आहे. या अहवालाची प्रत याचिकाकर्त्यांना उपलब्ध करून द्यावी आणि संबंधित प्रकरणांमधील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. मेधा नानिवडेकर यांनी केली आहे. विद्यमान कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे या प्रकरणात लक्ष देत नसल्याने कुलपतींकडे याबाबत तक्रार करणार असल्याचेही डॉ.नानिवडेकर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठात आता स्त्री अभ्यास केंद्राकडून 'विद्यापीठ बचाव'चा नारा देण्यात आला आहे. मागणी करूनही कुलगुरू भेटत नसल्याचेही डॉ. नानिवडेकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे याबाबत विद्यापीठ प्रशासन अथवा कुलगुरू काय स्पष्टीकरण देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.दरम्यान, राज्यात महिला अत्याचाराच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. 2018 मध्ये महिलांवर अत्याचाराच्या 35,497 घटना घडल्या होत्या तर 2019 मध्ये याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या वर्षी महिला अत्याचारात वाढ होऊन 37,567 महिला अत्याचाराच्या घटनासमोर आल्या आहेत. 2019 मध्ये 5412 महिलांवर बलात्कारच्या घटनांची नोंद झाली आहे. महिला अपहरणाच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. त्यामुळे आता या नव्या घोषणांची अंमलबजावणी होणं अधिक महत्वाचं आहे.

कानुन की बात
व्हिडीओ