img
img
Share On Facebook

पुणे : पुण्यातील काही प्रसिद्ध हॉटेलमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण असल्याची खोटी माहिती देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरेगाव पोलिस ठाण्यात अफवा पसरवल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या या तक्रारीमध्ये अनोळखी मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हॉटेलमध्ये कोरोना रुग्ण आहेत. तर काही ठिकाणच्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना देखील कोरोना झाला आहे. एवढेच नव्हे, तर काही परदेशातील नागरिक राहत असल्याची माहिती त्याने फोनवरून दिली होती. फोनवर मिळालेल्या माहितीची खात्री केली. त्यानंतर फोनवरून दिलेली संपूर्ण माहिती खोटी असल्याचे समोर आले. तसेच फोन करून कोरोनाची खोटी माहिती देणारी व्यक्ती पुण्यात अफवा पसरवत असल्याचे सुद्धा निष्पन्न झाले. पुण्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र रसाळ यांनी सांगितल्याप्रमाणे, अशा प्रकारच्या खोट्या माहितीमुळे विनाकारण लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. त्या व्यक्तीने कोरोनावर प्रशासनाला खूप मेसेज केले आहेत. अशाच स्वरुपाची अफवा त्याने पुण्यातील इतर लोकांमध्ये सुद्धा पसरवली असेल याची शक्यता नकारता येणार नाही. त्यामुळे, पोलिस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत असेही पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

देश-विदेश = राज्य
व्हिडीओ