img
img
Share On Facebook

नवी दिल्ली : कोरोनाचा फटका शेअर बाजाराला बसला आहे. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची किंमत पडल्यामुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मागील 10 दिवसात सोन्याच्या किमतीत तब्बल 5 हजारांची घसरण झाली आहे. मात्र आता सोन्यात तब्बल 2 हजारांची विक्रमी घसरण झाली आहे. 10 ग्रॅमसाठी सोन्याचे दर सध्या 39 हजार 661 आहेत. तर, चांदीचे दर प्रति किलो 6445 रुपयांनी घसरले आहेत.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे (आयबीजेए) राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी, शेअर बाजाराच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांसाठी सोने - चांदी संकटमोचक झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीची विक्री करण्यास सुरवात केली.
मागील आठवड्याच्या तुलनेत सोन्याचा भाव 2022 रुपयांनी घसरला

देशाच्या सराफा बाजारात 999 शुद्ध सोन्याचे भाव मागील आठवड्यात प्रति 10 ग्रॅम 42,017 रुपयांवरून 2,022 रुपयांनी घसरले आणि प्रति 10 ग्रॅम39 हजार 661 रुपये झाले. त्याचबरोबर चांदीचा दर शुक्रवारी, 43 हजार 085 रुपयांवरून घसरून 36 हजार 640वर आले होते.

पैसा बोलता है
व्हिडीओ