img
img
Share On Facebook

पन्ना : प्रेमभंग झाल्यांनंतर किंवा प्रेमविवाहासाठी नकार मिळाल्यानंतर आत्महत्या किंवा हत्येसारखा गुन्हा घडल्याच्या आपण अनेक घटना आपण पाहिल्या असतील. आत्महत्येचा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रेमी युगुलाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या प्रेमी युगुलाने आत्महत्येचा सगळा प्रकार सोशल मीडियावर लाईव्ह शेअर केला होता.
या घटनेमुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोघांनीही आत्महत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर लाइव्ह केला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.पन्नाच्या शाहनगर पोलीस स्टेशन परिसरातील देवरी पिपरिया गावात हे घडलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांना या प्रकरणी प्राचारण करण्यात आलं.
देवरी गावचा अरुण पाल (वय 20) आणि खुशी (19) दोघे एकमेकांवर प्रेम करत होते. पण त्यांचं हे नातं भिन्न समाजातील असल्यानं कुटुंबास मान्य नव्हतं. यावर्षी 25 फेब्रुवारी रोजी कुटुंबियांनी खुशीचं दुसऱ्या मुलाशी लग्न लावून दिलं. होळीच्या दिवशी खुशी तिच्या माहेरी आली होती. त्यावेळी तिची भेट अरुणशी झाली. दोघांना आपले प्रेमाचे सर्व दिवस आठले आणि रडू लागले.
यानंतर आपण एकत्र राहू शकत नाही एकत्र मरू तरी असा विचार करत दोघांनीही एकत्र मरण्याचं ठरवलं. दोघेही गावात झाडीमध्ये गेले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे दोघांनी एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर खुशीची ओढणी झाडाला उंच बांधली. यानंतर एकमेकांना मिठीत घेतच दोघांनी आपला जीव सोडला.
ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. तात्काळ या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून अरूण आणि खुशीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस सध्या या संपूर्ण प्रकाराचा तपास करत आहे.

कानुन की बात
व्हिडीओ