img
img
Share On Facebook

मुंबई, 03 जून : एकीकडे कोरोना, दुसरीकडे चक्रीवादळ या सगळ्या संकटात सोन्या-चांदीचे भावही गडगडले आहेत. मंगळवारी सोन्याच्या भावामध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याची पाहायला मिळाली. मात्र आज पुन्हा सोन्याच्या दरात घट झाली आहे. एमसीएक्स ऑगस्टच्या सोन्याच्या दरानुसार आज 10 ग्रॅम सोन्याचे दर 46 हजार 470 आहेत. तर चांदीही घसरली आहे. चांदीचे प्रति किलो मागे 48 हजार 830 झाली आहे. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिका आणि चीन यांच्यातील वादामुळं तसेच अमेरिकेत सुरू असलेल्या आंदोलनामुळं सोन्यांच्या किंमतीत बदल झालेला दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमती कमी 0.2% ने कमी झाल्या. तर प्लाटिनमच्या दरात 0.1% वाढ झाली आहे. तर चांदीचे दर 0.6% घसरले आहेत. दरम्यान भारतात या महिन्याच्या 15 मे रोजी सोन्याच्या किंमतींनी 47,067 रुपये प्रति तोळावर पोहचून एक रेकॉर्ड रचला होता. मात्र त्यानंतर सोन्याच्या किंमतीत घट झाली. लॉकडाऊनमध्ये सोन्याच्या किंमतीत चढ उतार पाहायला मिळाला आहे.

पैसा बोलता है
व्हिडीओ