img
img
Share On Facebook

लातूर जिल्हा आम आदमी पार्टीचे निवेदन

लातूर : कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक निेयोजनच कोलमडून गेल्याने आणि वीजेच्या अतिरीक्त बिलाने हैराण सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एप्रिल ते जून या तिमाहीचे २०० युनिटपर्यंतचे घरगुती वीज वापराचे बील माफ करावे अशी मागणीसाठी ३ जून रोजी आम आदमी पार्टीने राज्यव्यापी वीज बील माफ करावे आंदोलन जाहीर केले होते,त्याचा एक भाग म्हणून लातूर जिल्हा आप समितीच्या एका शिष्ठमंडळाने तहसीलदार पवार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यंाच्याकडे निवेदन सादर केले.
जीवघेणा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने २४ मार्चपासून राज्यात लाऊडाऊन जाहीर केले.त्यामुळे सर्वसामान्य,हातावर पोट असणार्‍या,श्रमिकांचे आर्थिक नियेाजन पूर्णत ः कोलमडले आहे,त्याचप्रमाणे घरात अधिक वास्तव झाल्याने वीज वापरही अधिक झाला.परिणामी वीजेची बिलेही या घटकांच्या आवाक्याबाहेरची येत आहेत,त्यांना यातून दिलासा मिळण्यासाठी दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या धर्तीवर राज्यातील सर्वसामान्यांची २०० युनिटपर्यंतची वीज बिले माफ करावीत अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे लातूर तहसीलदार यंाच्यामार्फत लातूर जिल्हा आम आदमी पार्टी समितीच्यावतीने बुधवारी करण्यात आली.
सदरील निवेदनावर आपचे जिल्हाध्य प्रताप भोसले,उपाध्यक्ष बाळ होळीकर,सचिव सैदोद्दीन सय्यद, संघटनमंत्री जयश्री तोंडारे,सोशल मिडीया प्रमुख हरी गोटेकर,निलंगा विधानसभा अध्यक्ष माजी सैनिक आनंदा कामगुंडा, आप युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अमित पांडे, आप ऑटोरिक्षा विंग जिल्हाध्यक्ष नैमोद्दीन शेख,कार्यकर्ते नितीन चालक आदिंची नावे व सह्या आहेत.

लातूर
व्हिडीओ