img
img
Share On Facebook

तिरुअनंतपुरम: केरळमध्ये अननसात फटाके घालून हत्तीणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. केरळचे वनमंत्री के राजू यांनी याबाबतची माहिती दिलीय. वन विभागाने या प्रकरणी तपासाकरता ३ पथके नियुक्त केली होती. पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. तसेच असा प्रकार यापुढे कधीच घडू नये यासाठी कडक कारवाई करण्यात येईल असेही राजू यांनी स्पष्ट केले.
या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात आला. हत्तीणीच्या मृत्यूच्या घटनेसंदर्भात तीन संशयितांची चौकशी केली जात असून अन्य दोन संशयितांचा शोध घेण्यात येत असल्याचे वनविभागातील सांगितले होते. या १५ वर्षीय हत्तीणीने फटाके भरलेले अननस खाल्यानंतर ते फटाके तिच्या तोंडात फुटले. त्यानंतर जखमी झालेल्या या हत्तीणीचा २७ मे रोजी वेलियार नदीत मृत्यू झाला.
अटक करण्यात आलेला आरोपी सुमारे ४० वर्षांचा असून तो स्फोटके पुरवण्याचे काम करतो, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणात केलेली ही पहिलीच अटक आहे.
तिन्ही संशयितांवर आमची नजर असल्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी म्हटले आहे. या तिन्ही संशयितांवर लक्ष केंद्रित करून चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिस आणि वनविभाग संयुक्तपणे या घटनेचा तपास करणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री विजयन यांनी ट्विटद्वारे दिली.
दरम्यान, जिल्हा पोलिस प्रमुख आणि जिल्हा वन अधिकाऱ्यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट दिली. दोषींना न्याय देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. दरम्यान, या तपासणीस महत्त्वपूर्ण यश मिळाल्याचे वनविभागाने म्हटले आहे. हत्तीणीच्या मृत्यूच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने अनेक संशयितांची चौकशी केली आहे. दोषींना शिक्षा करण्यासाठी कसलीही कसर सोडणार नसल्याचे वनविभागाने म्हटले आहे. या प्रकरणी अनेक संशयितांची चौकशी केली गेली आहे. यासंदर्भात स्थापन झालेल्या एसआयटीला महत्त्वपूर्ण माहिती मिळालेली आहे. दोषींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी वन विभाग कोणतीही कसर सोडणार नाही, अशी माहिती वनविभागाने ट्विट करत दिली आहे.

कानुन की बात
व्हिडीओ